'बुरखा बंदी'बाबत शिवसेना नेत्यांमधील मतभिन्नता चव्हाट्यावर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 मे 2019

मुंबई : श्रीलंकेत बॉम्बस्फोटांच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या "बुरखा बंदी'चे समर्थन करत शिवसेनेने "सामना'च्या अग्रलेखातून भारतातही अशी बंदी घालण्याचे साकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींना घातले आहे. यावरून विरोधकांनी टीकास्त्र सोडलेले आहे. अशातच बुरख्याबाबत शिवसेना नेत्यांमधील मतभिन्नता चव्हाट्यावर आली आहे.

बुरखा बंदीची मागणी शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, असे शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. त्याच वेळी "महिला नेत्यांनी मुस्लिम महिलांचे दुःख समजून घ्यावे', असा सल्ला "सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी गोऱ्हे यांना दिला.

शिवसेनेच्या भूमिका नेत्यांच्या बैठकीतून ठरत असतात. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्या अंतिम होतात. "सामना'च्या अग्रलेखातील भूमिका ना चर्चेतून आली, ना आदेशातून आली आहे. त्यामुळे कदाचित हे चालू घडामोडींवरील वैयक्तिक मत असेल. शिवसेनेची ती अधिकृत भूमिका नाही, असे नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे. "एमआयएम'चे नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही शिवसेनेवर टीका केली

महिला नेत्यांनी मुस्लिम महिलांचे दुःख समजून घ्यावे. तिहेरी तलाकला विरोध आणि बुरखा बंदी नको, असे समर्थन महिला नेत्यांनी तरी करू नये.
- संजय राऊत, शिवसेना नेते

Web Title: clashes between Shivsena leaders on Burkha ban

संबंधित बातम्या

Saam TV Live