पुणे आणि ईशान्य मुंबईमध्ये अजूनही उदासीनता

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 एप्रिल 2019

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीचे पुण्याच्या उमेदवारीवरून, तर शिवसेना-भाजप युतीचे ईशान्य मुंबईवरून अडले आहे. अद्याप या दोन्ही ठिकाणचे उमेदवार जाहीर झाले नाहीत. 

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीचे पुण्याच्या उमेदवारीवरून, तर शिवसेना-भाजप युतीचे ईशान्य मुंबईवरून अडले आहे. अद्याप या दोन्ही ठिकाणचे उमेदवार जाहीर झाले नाहीत. 

युतीत ईशान्य मुंबई मतदारसंघ भाजपकडे असून, येथून किरीट सोमय्या हे खासदार आहेत. मात्र, सोमय्यांनी सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. "मातोश्री'वर टीका केल्याने सोमय्या यांना शिवसैनिकांचा विरोध आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत अद्याप काहीच हालचाली झाल्या नाहीत. या मतदारसंघाबाबत भाजपची भूमिका गुलदस्तात आहे. त्यामुळे सध्या या मतदारसंघात "जैसे थी' परिस्थिती आहे.

युतीमध्ये बहुतेक मतदारसंघांचा तिढा सुटला आहे. त्यामुळे शिवसेना 23, तर भाजप 25, अशा लोकसभेच्या जागा लढवल्या जाणार आहेत. युतीप्रमाणे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे पुण्याच्या उमेदवारीवरून अडले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस 19, कॉंग्रेस 26, तर आघाडीचे घटक पक्ष तीन जागा, असे ठरले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने सक्षम उमेदवार नसल्यामुळे रावेरची जागा कॉंग्रेस पक्षाला सोडली आहे. तर, सांगलीमध्ये शेवटपर्यंत घोळ होता. कॉंग्रेसने ही जागा मित्र पक्ष स्वाभिमानीला सोडली आहे. तेथे विशाल पाटील स्वाभिमानीचे उमेदवार आहेत. तर, पुण्याची जागा कॉंग्रेसकडे आहे. येथे उमेदवारीवरून शेवटपर्यंत घोळ होता. मात्र, कॉंग्रेसने संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांना पक्षात प्रवेश दिला आहे. मात्र, अद्याप उमेदवारी जाहीर केली नाही.

Web Title: Congress and BJP candidate not yet final for loksaha election in Maharashtra


संबंधित बातम्या

Saam TV Live