काँग्रेसला आणखी एक धक्का; विजय पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

विरार : निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली असतानाच आज वसई काँग्रेसचे दिग्गज आणि प्रदेश सचिव विजय पाटील यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. विजय पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विजय पाटील यांना विधानसभेची वसईमधून उमेदवारी शिवसेनेतून मिळणार असल्याची चर्चा वसईमध्ये रंगू लागली आहे. 

वसई विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल म्हणून काही वर्षांपासून विजय पाटील प्रयत्नशील होते. परंतु काँग्रेस पक्ष मात्र विद्यमान आमदार हितेंद्र ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीसोबत राहत असल्याने काँग्रेसमधून उमेदवारी मिळणार नसल्याने अखेर विजय पाटील यांनी आज 'मातोश्री'वर जाऊन सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्याबरोबर मनसेचे माजी तालुका प्रमुख प्रफुल्ल ठाकूर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

काँग्रेसचे प्रदेश सचिव असलेल्या विजय पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विजय पाटील यांच्या सेनेतील प्रवेशाने वसईमध्ये मात्र सेनेची उमेदवारी कोणाला हा प्रश्न मात्र उभा राहिला आहे.

सेनेतर्फे आतापर्यंत माजी आमदार विवेक पंडित, सायमन मार्टिन यांची नावे चर्चेत असताना आता विजय पाटील यांचेही नाव पुढे आल्याने सेनेतून नक्की कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Congress Leader Vijay Patil join Shivsena
 
संबंधित बातम्या

Saam TV Live