प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी अधिक वेगाने सुरू

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 24 जानेवारी 2019

मुंबई - मोठ्या प्रयत्नांनंतर सहा महिन्यांपूर्वी राज्यभरात प्लास्टिकबंदी लागू झाली. जनजागृतीनंतर हळूहळू प्लास्टिकच्या जागी कापडी पिशव्या दिसू लागल्या. मात्र, सध्या प्लास्टिकबंदीला मुंबईकरांनी ठेंगा दाखवल्याचे निराशाजनक चित्र आहे.

चित्रपटगृह, मॉल, मोठमोठ्या शो-रूम आणि कपड्यांच्या दुकानांत बंदी पाळली जात असली, तरीही घाऊक बाजार, किराणा मालाचे दुकान आणि रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी आजही प्लास्टिक पिशव्या सरसकट वापरल्या जात आहेत. साहजिकच प्लास्टिकबंदी खरेच लागू झाली आहे का, असा प्रश्‍न पर्यावरणप्रेमी उपस्थित करत आहे. 

रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाले, फळ-भाजी विक्रेते आणि रुग्णालयाजवळील नारळ पाणीवाले ग्राहकांना सर्रास प्लास्टिकच्या पिशव्या देत आहेत. प्लास्टिकच्या स्ट्रॉवरही बंदी आहे; परंतु त्याचेही उल्लंघन होत आहे. नारळ पाणी घेऊन जाण्यासाठी पिशव्याही दिल्या जात आहेत. भाजीविक्रेतेही ग्राहकांना सर्रास प्लास्टिकच्या पिशव्या देत आहेत.  

प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी अधिक वेगाने सुरू आहे. याबाबतची कारवाई मंदावली नसून, जप्त केल्या जाणाऱ्या प्लास्टिकचे प्रमाणही वाढत आहे.

 - विजय बालमवार,  उपायुक्त, महापालिका 

Web Title: Continuing the execution of the ban on plastic ban

संबंधित बातम्या

Saam TV Live