महाराष्ट्र विकास आघाडी भाजपला झटका देण्याच्या तयारीत; घेणार 'हा' मोठा निर्णय?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 डिसेंबर 2019

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्यास सरुवात केली आहे. अशातच आता भाजपनेत्यांना महाविकास आघाडीचे सरकार मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. भाजप सरकारने महामंडळावर केलेल्या सर्व नियुक्त्या सरकार रद्द करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबातचा निर्णय घेणार असून याबाबत लवकरच आदेश निघणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा झपाटा महाविकास आघाडीच्या सरकारने लावला आहे. आरे कारशेडसंबंधित तरुणांवरील गुन्हे मागे घेणे, महापरिक्षा पोर्टल रद्द करणे असे अनेक निर्णय रद्द केलेले असतानाच हा महामंडळावरील नियुक्त्या रद्द करणे हे भाजपसाठी मोठा झटका मानला जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अल्पसंख्यांकांच्या विषयांवर एका आठवड्यापासून अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष या नात्याने हाजी अराफात शेख वेळ  मागत होते. मात्र वेळ देत नसल्या कारणाने आज (ता.११) त्यांनी मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपविला आहे. राजीनामा पत्रात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ते उद्या 12 वाजता राजीनामा राज्यपालांकडे देणार आहेत.

Web Title: corporation Presidents appointments by BJP government will be canceled

संबंधित बातम्या

Saam TV Live