दूरसंपर्क विभाग कडून बेकायदा मोबाईल सिग्नल रिपीटर्सवर कारवाई 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 जून 2019

मुंबई - कॉल ड्रॉप्स, इंटरनेट डेटा स्पीडमध्ये अडथळा ठरणाऱ्या मोबाईल रिपीटर्सवर वायरलेस मॉनिटरिंग ऑर्गनायझेशन, दूरसंपर्क विभाग (डॉट) यांच्या पथकांनी मुंबई आणि ठाण्यात छापे घालून बेकायदा मोबाईल सिग्नल रिपीटर्सवर कारवाई केली. या कारवाईत २३ रिपीटर्स हटवण्यात आले; तर १४ जणांना नोटीस बजावून हटवण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाईल सिग्नल सुधारण्यासाठी घरे, कार्यालये, गेस्ट हाउसेस या ठिकाणी कंपन्या स्थानिकांच्या मदतीने बेकायदा मोबाईल रिपीटर्स बसवतात. हे बेकायदा उपकरण मोबाईल नेटवर्कमध्ये हस्तक्षेप करते, सिग्नलच्या दर्जावर याचा परिणाम होतो व संपूर्ण परिसरातील नेटवर्कचा दर्जा खालावतो. ठाणे, दादर, झवेरी बाजार, विले पार्ले पूर्व, एमजी रोड, दलाल स्ट्रिट, ग्रांट रोड, दोनताड स्ट्रीट, जे. बी. नगर, काळबादेवी रोड, सीपी टॅंक रोड, फणसवाडी, शमशेट स्ट्रिट या भागांतील बेकायदा मोबाईल सिग्नलवर छापे घातले. जागतिक दर्जाच्या नेटवर्कसाठी टेलिकॉम कंपन्या प्रयत्न करतात, मात्र बेकायदा नेटवर्क बूस्टर्समुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.

Web Title: Crime on Illegal Mobile Signal

संबंधित बातम्या

Saam TV Live