मुंबईतील क्रिस्टल टॉवर आग प्रकरणी बिल्डरची पोलिस कोठडीत रवानगी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मुंबईतील क्रिस्टल टॉवर आग प्रकरणी विकासक अब्दुल रझाक सुपारीवालाची २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी झालीय.

परळच्या उच्चभ्रू परिसरातील 17 मजली क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत चार नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक वृद्ध महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. तर 16 जणांवर केईएममध्ये उपचार सुरु आहेत.

पाच वर्षापूर्वी बांधलेल्या या इमारतीला ओसी नव्हतं, तसंच बिल्डरने अग्निरोधक यंत्रणाही बसवलेली नाही असा दावा  रहिवाशांनी केलाय.

दरम्यान क्रिस्टल टॉवर आग प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय़..या याचिकेवर 6 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live