मुंबईचे डबेवाले जाणार सुट्टीवर..

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 6 जुलै 2019

मुंबईकरांना घरच्या जेवणाचे डबे कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचवणारे मुंबई डबेवाले शुक्रवार (12 जुलै) आणि शनिवार (13 जुलै) असे दोन दिवसाची सुटी घेणार आहेत. त्यामुळे दोन दिवस नोकरदार वर्गाला घरचे जेवण मिळणार नाही. 

आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी डबेवाले सुट्टी घेणार आहेत. आषाढी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशी डबेवाल्यांसाठी महत्वाच्या असतात. त्यामुळे कार्तिकी एकादशीला ते आळंदीला ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनाला जातात आणि आषाढी एकादशीला ते पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. त्यामुळे आषाढी एकादशी व द्वादषीच्या दिवशी डबेवाले सुट्टी घेणार आहेत.

पंढरपूर येथे डबेवाल्यांची धर्मशाळा आहे. या धर्मशाळेत जेवढे वारकरी मुक्कामास येतात, त्या सर्वांची विनामूल्य राहाण्याची व द्वादशीच्या भोजनाची सोय डबेवाल्यांकडून दरवर्षी केली जाते. तशी सोय मुंबई डबेवाला या संघटनेकडून यंदादेखील करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या शुक्रवार आणि शनिवारी मुंबईत डबे पोहोचविण्याची सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी दिली आहे.

दरम्यान, सोमवार, 15 जुलैपासून सेवा सुरळीतपणे चालू राहील, असे मुके यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

Saam TV Live