मुंबईच्या डबेवाले सुरू करणार कुरियर सेवा 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

मुंबईच्या डबेवाल्याच्या हातात आता डब्यांऐवजी पत्रांचा गठ्ठा आणि पार्सल दिसल्यास नवल वाटून घेऊ नका. मुंबईच्या डबेवाल्यांनी कुरियर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईत 126 वर्षांपासून डबेवाल्यांची सेवा सुरू आहे. मुंबईतली गल्लीनगल्ली आणि ऑफिसेस डबेवाल्यांना माहिती आहेत. त्यामुळं त्यांनी कुरियर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. डबे पोहचवण्याच्या सेवेतून मर्यादित उत्पन्न मिळतं. उत्पन्न वाढवण्यासाठी डबे पोहचवण्यासोबत कुरियर सेवाही देण्याचा डबेवाल्यांचा मानस आहे. डबेवाल्यांनीही स्वतःच्या कामाचा केलेला हा विस्तार सकारात्मकच म्हणावा लागेल.

डबे पोहचवण्याच्या सेवेनं जसं डबेवाल्यांचं नाव जगभर झालं. तसंच कुरियर सेवेतूनही डबेवाले आपलं नाव करतील यात शंका नाही.

संबंधित बातम्या

Saam TV Live