मुंबई मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी आता डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 मे 2019

मुंबई - जून 2014 मध्ये सुरू झालेल्या मुंबई मेट्रो-1 च्या प्रवाशांना गुरुवारपासून (ता. 16) तिकीट काढण्यासाठी डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर करता येईल. ही सुविधा प्रत्येक स्थानकात उपलब्ध असेल. 

मुंबई - जून 2014 मध्ये सुरू झालेल्या मुंबई मेट्रो-1 च्या प्रवाशांना गुरुवारपासून (ता. 16) तिकीट काढण्यासाठी डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर करता येईल. ही सुविधा प्रत्येक स्थानकात उपलब्ध असेल. 

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील मेट्रो स्थानकांतील सुविधेमुळे प्रवाशांना सिंगल जर्नी टोकन, रिटर्न जर्नी टोकन; तसेच स्मार्ट कार्ड रिचार्ज करणे शक्‍य होईल. त्यासाठी तिकीट खिडकीवर जाऊन स्टॅटिक क्‍यूआर कोड स्कॅन करावा लागेल किंवा तेथे नमूद केलेल्या लिंकवरून डेबिट/क्रेडिट कार्डचा तपशील देऊन रक्कम अदा करता येईल. त्यानंतर प्रवाशांना तिकीट किंवा स्मार्ट कार्ड रिचार्ज मिळेल. 

संबंधित लिंक जतन केल्यास प्रवाशांना तिकीट खिडकीवर येण्यापूर्वी किंवा आल्यावर पेमेंट करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल. तिकीट निश्‍चित झाल्याचा एसएमएस खिडकीवर दाखवल्यावर त्यांना कागदी तिकीट मिळेल. 

मुंबई मेट्रो वन कंपनीने पाच वर्षांत विविध उपक्रम राबवले आहेत. या नव्या सुविधेमुळे नागरिकांसाठी प्रवास करणे अधिक सुलभ होईल. लिंक-बेस्ड पेमेंट प्रणालीला प्रवाशांकडून नक्कीच प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वास मुंबई मेट्रो 1 च्या प्रवक्‍त्यांनी व्यक्त केला. 

मोबाईल ऍप, "पॉस' मशीन अनावश्‍यक 
मुंबई मेट्रो-1 मार्गावरील सुमारे साडेचार लाख प्रवाशांना डेबिट-क्रेडिट कार्डवरून तिकीट काढण्याची सुविधा इन्स्टामोजो या पेमेंट गेटवेने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी प्रवाशांना मेट्रो स्थानकावर "पॉस' (पॉईंट ऑफ सेल) मशीन किंवा स्मार्टफोनमध्ये पेमेंट ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्याची गरज नाही. प्रवाशांना कार्ड स्वाईप करण्यासाठी कोणाच्या हाती द्यावे लागणार नाही. 

Web Title: With the debit and credit card the tickets for Mumbai Metro


संबंधित बातम्या

Saam TV Live