देशभरात श्रीकृष्णजन्माष्टमीचा उत्साह 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

दिल्लीतील इस्कॉन मंदिरदेखील जन्माष्टमीनिमित्त सजलंय.  श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी इस्कॉन मंदिरात दिव्यांची रोषणाई करण्यात आली. यावेळी फुलांची आरास करत श्रीकृष्णाची विधीवत पूजादेखील करण्यात आली. 

मुंबईच्या इसकॉन मंदिरात श्रीकृष्णजन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी श्रीकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. जन्माष्टमी निमित्त मुंबईतील इसकॉन मंदिरही सजवण्यात आलंय.

दिल्लीतील इस्कॉन मंदिरदेखील जन्माष्टमीनिमित्त सजलंय.  श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी इस्कॉन मंदिरात दिव्यांची रोषणाई करण्यात आली. यावेळी फुलांची आरास करत श्रीकृष्णाची विधीवत पूजादेखील करण्यात आली. 

संपूर्ण राज्यात श्रीकृष्ण जन्माचा उत्साव पाहायला मिळतोय. मथुऱ्यातील श्रीकृष्ण मंदिरातही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मथुऱ्यातील श्रीकृष्ण मंदिरही फुलांनी सजवण्यात आलं होतं. यावेळी श्रीकृष्णाची पूजा करुन महाआरती करण्यात आली.

दरम्यान, श्रीकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली. बंगळूरमधील एस्कॉन मंदिरातही जन्माष्टमीचा सण साजरा केला जातोय. इथं कृष्णजन्माचा सोहळा पाहण्य़ासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीय. कृष्ण, गोपाळ आणि गोपिकांच्या वेषभूषेत लहानग्यांनी मंदिरात हजेरी लावलीय.

WebTitle : marathi news mumbai delhi mathura janmashtami celebration 

संबंधित बातम्या

Saam TV Live