मुंबई-दिल्ली प्रवास एक तासाने कमी होणार

मुंबई-दिल्ली प्रवास एक तासाने कमी होणार

मुंबई सेंट्रल येथून राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीस जाणाऱ्या प्रवाशांचा आता प्रवासाचा एक तास वाचणार आहे. मुंबई सेंट्रल-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस शनिवारपासून पुश-पूल पद्धतीने चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला. यामुळे मुंबई-दिल्ली प्रवासात प्रवाशांचा एक तास कमी होणार आहे. 
 
''राजधानी' पुश-पूल पद्धतीने चालवण्याकरिता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. शनिवारपासून काही दिवस 'राजधानी' पुश-पूल पद्धतीने धावेल. त्यानंतर वेळापत्रकात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल', अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली. राजधानी एक्स्प्रेसनंतर पुढील टप्प्यात ऑगस्ट क्रांती राजधानी देखील पुश-पूल पद्धतीने चालवण्याचे नियोजन असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हजरत निजामुद्दीन राजधानी पुश-पूल पद्धतीने धावत आहे.

राजधानी एक्स्प्रेस सद्यस्थितीत मुंबई-दिल्ली हे १३८४ किमीचे अंतर सुमारे १६ तासांत पार करते. पुश-पूल पद्धतीने राजधानी एक्स्प्रेसच्या पुढे आणि मागे प्रत्येकी ६००० अश्वशक्तीचे इंजिन जोडण्यात येईल. यामुळे स्थानकातून रवाना होताच अल्पावधीत तिला वेग घेता येईल. शिवाय ब्रेक तातडीने कार्यान्वित करणे अधिक सोपे होईल. यामुळे प्रवासी अंतर वेगाने कापणे शक्य होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.   

मुंबई-दिल्ली मार्गावर एक्स्प्रेस  मार्गावरच काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई-दिल्ली हे अंतर १० तासांत पूर्ण करणे शक्य होईल. 
 

 Web Title mumbai delhi rajdhani express travel time to be cut down by 1 hour

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com