पंकजा मुंडे यांच्यावर देवेंद्र फडणवीसांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

मुंबई : पक्षात नाराज असल्याच्या चर्चांनंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांच्यावर स्पष्टीकरण दिले आहे. भारतीय जनता पक्षात मी कधीही गट तयार केला नाही. मी कायम पंकजाताईंच्या कायम मागे उभा राहिलो आहे. मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर मी त्यांना कोअर कमिटीमध्ये काम करण्याची संधी दिली. त्यानंतर त्या मंत्री झाल्या, मंत्री झाल्यावरही त्यांच्याकडे दोन्हीही महत्वाची खाती होती, असेही फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस बोलत होते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फडणवीस म्हणाले, 'ग्रामविकास आणि महिला आणि बालविकास खात्यासारखी महत्वाची खाती त्यांना दिली. सभागृहातही त्यांना धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीने त्यांना टारगेट करण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येकवेळी मी त्यांच्या पाठीमागे उभे राहिलो आहे. पुढेही मी कायम पंकजा मुंडे यांच्या पाठीमागे राहणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

भाजप हा ओबीसांचाच पक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडेच्या स्मारकासाठी निधी देऊन वर्क ऑर्डरही निघाली आहे, खडसेंचा आरोप खोटा असल्याचे त्यांनी यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुंडेच्या स्मारकासाठी ४६ कोटी रुपये दिले असून त्याची वर्क ऑर्डरही दिली आहे. मुंडे साहेबांच्या स्मारकाची वर्क ऑर्डर चार महिन्यांपूर्वीच निघालेली आहे. परंतु, आचारसंहितेमुळे ते लांबत गेल्याची कबुलीही फडणवीसांनी यावेळी दिली. स्मारकाचे टेंडरही दहा महिन्यापूर्वीच निघाले असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, आम्हाला मिळालेल्या जनादेशाचा मित्रपक्षाने विश्वासघात केला असून शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला असल्याचे मतही फडणवीस यांनी व्यक्त केले. शिवसेना काँग्रेससोबत जाईल असं वाटलचं नव्हतं. शिवसेनेवरच्या अतिविश्वासामुळेच सत्ताही गमावली असल्याचेही फडणवीस यांनी मान्य केले. अजित पवार यांनी शरद पवार (काका)शी बोललो असल्याचे म्हणाले म्हणूनच त्यांच्यावर विश्वास ठेवला असल्याचेही फडणवीस यांनी या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. आम्हाला मिळालेल्या जनादेशाचा मित्रपक्षाने विश्वासघात केला असून निवडणुकीत आमचा पराभव नाही, लढलेल्या 67 ते 70 टक्के जागा आम्ही जिंकल्या असल्यामुळे विजय हा आमचाच झालेला आहे. निवडणुकीत आमचा पराभव झालेलाच नाही, असेही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Devendra Fadnavis clarifies about pankaja munde in TV interview
 
संबंधित बातम्या

Saam TV Live