VIDEO | देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर घणाघात...

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संपर्क साधला. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय. माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रामुख्याने तीन मुद्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्ये राज्यात रखडलेला मंत्रिमंडळविस्तार शेतकरी कर्जमाफी आणि हिवाळी अधिवेशनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.  

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संपर्क साधला. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय. माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रामुख्याने तीन मुद्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्ये राज्यात रखडलेला मंत्रिमंडळविस्तार शेतकरी कर्जमाफी आणि हिवाळी अधिवेशनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.  

महाराष्ट्रात सर्व कामं ठप्प : 
महाराष्ट्रात नवीन सरकार येऊन अनेक दिवस झालेत. मात्र  अजूनही महाविकास आघाडीने कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं आणि मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप केलेला नाही. राज्यात कोणतही काम सुरु नाही. अशातच जेवढ्या बातम्या येतायत त्या फक्त वेगाने सुरु आलेल्या कामांच्या स्थगितीच्याच आहेत. असं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.  

हिवाळी अधिवेशन केवळ औपचारिकता : 
नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन हे निव्वळ औपचारिकता म्हणून सरकारकडून घेतलं जातंय. मंत्रिपदांचं वाटप अद्याप झालेलं नाही. अशा परिस्थितीत आम्ही प्रश्न कुणाला विचारायचे? असा सवाल फडणवीस यांनी सरकारला विचारलाय. हिवाळी अधिवेशन केवळ सहा दिवसांचे असणार आहे. त्यामुळे हे अधिवेशन म्हणजे निव्वळ दिखावा असल्याचं फडणवीस म्हणालेत.     

शेतकरी कर्जमाफी कधी :  
महाविकास आघाडीकडून सरकार स्थापन करून अनेक दिवस उलटले आहे. अशात अजूनही शेतकरी कर्जमाफीवर कोणतीच ठोस पावलं उचललेली पाहायला मिळत नाहीत. आम्ही या सरकारला संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत. येणाऱ्या वर्षात काही गोष्टी बाजूला ठेऊन शेतकर्यांना कर्जमाफी द्यायला हवी, असं मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलंय.    

'कॅब'ला शिवसेनेने पाठींबा द्यावा : 

'कॅब' (Citizen Amendment Bill) वर लोकसभेत शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केलंय. दरम्यान आज उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया संदिग्ध असल्याचं फडणवीस म्हणालेत. उद्या हे विधेयक राज्यसभेत मांडलं जाणार आहे. उद्धव ठाकरे यांनी आज घेतलेल्या भूमिकेमुळे कॉंग्रेचा शिवेनेवर काही दबाव तर नाही ना ? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय.   

WebTitle :  Devendra fadnavis Criticize Goverment over various points


संबंधित बातम्या

Saam TV Live