ठाकरे सरकारवर फडणवीसांची टीका...

Devendra Fadnavis, Vidhansabha
Devendra Fadnavis, Vidhansabha

मुंबई : नियमबाह्य आणि असंवैधानिक पद्धतीने बोलविण्यात आलेल्या राज्य विधानसभेच्या अधिवेशनाविरुद्ध आज सभागृहात आक्षेप मांडले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची आणि संसदीय प्रथांची संपूर्ण पायमल्ली या सरकारने केली, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. 

उद्धव ठाकरे यांच्या सरकारची बहुमत चाचणी आज पार पडली. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या बाजूने 169 आमदारांनी मतदान केले. तर इतर चार आमदारांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. या बहुमत चाचणीवरच फडणवीस यांनी ट्विट करत सत्ताधारी महाविकासआघाडीवर टीकास्त्र सोडले. त्यानी ट्विटमध्ये सांगितले, की 27 नोव्हेंबर रोजी जे अधिवेशन झाले, ते 'वंदे मातरम्'ने सुरू झाले आणि राष्ट्रगीताने सांगता झाली. याचा अर्थ ते अधिवेशन संस्थगित झाले होते. नव्याने अधिवेशन बोलवण्यासाठी राज्यपालांकडून समन्स असावा लागतो. मध्यरात्री एक वाजता हे कळविण्यात येते. यामागे नेमका उद्देश काय? नूतन अध्यक्षांची निवड होईपर्यंत हंगामी अध्यक्ष हे कायम राहत असतात. पण या सरकारने त्यातही बदल केला.  

तसेच नवीन हंगामी अध्यक्ष आणले गेले. देशाच्या इतिहासात असे आजवर कधी घडले नाही. संविधानाची पूर्णतः पायमल्ली येथेही करण्यात आली. अध्यक्षांची निवड झाल्याशिवाय विश्वास मत कधीही मांडण्यात आलेले नाही. हा पराक्रम सुद्धा या सरकारने केला. भारताच्या इतिहासात हे प्रथमच घडले. नियमबाह्य पद्धतीने सभागृह चालविण्याचा आणि दडपशाहीचा मी निषेध करतो, असे फडणवीस म्हणाले.

Web Title: Devendra Fadnavis Criticizes New Thackeray Government
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com