"काही गोष्टी झाल्या नसत्या, तर बरं झालं असतं" - धनंजय मुंडे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रात गेले काही दिवस भुकंपावर भूकंप येताना पाहायला मिळालेत. दरम्यान अजित पवार हेच या सर्व  सत्ता नाट्याच्या केंद्रस्थानी होते. अजित पवार यांच्यासोबत कायमच सोबत राहणारे, अजित पवार यांचे खंदे समर्थक धनंजय मुंडे यांच्यावर देखील काही प्रश्न उपस्थित केले गेले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संध्याकाळी चार वाजेपर्यंत धनंजय मुंडे कुठे आहेत हे कुणालाच माहित नव्हतं. त्यांच्या अनुपस्थितीमुळे सर्वांच्या मनात त्यांच्याबद्दलचे प्रश्न उपस्थित झाले होते .  

दरम्यान घडलेल्या 'त्या' सर्व प्रकारावर धनंजय मुंडे यांनी आपलं मौन सोडलंय. महाराष्ट्रातील त्या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल धनंजय मुंडे यांनी BBC मराठीला प्रतिक्रिया दिली आहे.  

काय म्हणालेत धनंजय मुंडे 
सकाळी आठ वाजता शपथविधी झाला, शपथविधी झाला हे मला ठाऊक नव्हतं. 
मी रात्री दोन वाजता एका मित्राच्या घरी थांबलो होतो. 
मी दुपारी एक वाजता झोपून उठलो तेंव्हा मला घडलेला सर्व प्रकार समाजाला. 
तोपर्यंत मला कुणीही झोपेतून उठवलं नव्हतं  
संध्याकाळी चार वाजता बैठक आहे हे समजल्यावर मी त्याठिकाणी पोचोचालो  
मी पक्षासोबत आणि शरद पवार साहेबांसोबत आहे
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देखील मी शरद पवार साहेबांसोबत आहे असं म्हटलं होतं 
मात्र , काही गोष्टी झाल्या नसत्या तर बरं झालं असतं.
आता अजित पवार यांनी राजीनामा दिलाय त्यामुळे तो विषय संपला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिली आहे. 

Webtitle : dhanajay munde on ajit pawars oath handshake with BJP and maharashtra crisis

संबंधित बातम्या

Saam TV Live