धारावीमुळे मुंबईला मोठा धोका, परिसर पूर्णपणे सील होण्याची शक्यता

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 8 एप्रिल 2020

धारावीमुळे मुंबईला धोका निर्माण झालाय. त्यामुळे हा परिसर सील करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

दाट लोकसंख्येमुळे धारावीमध्ये कोरोना पसरण्याची भीती आहे. त्यामुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण धारावी थोड्याच वेळात लॉकडाऊन होणार असल्याची माहिती, सुत्रांनी साम टीव्हीला दिलीय.

पाहा व्हिडीओ -

 

 याआधी खासदार राहुल शेवाळे यांनी, धारावी पूर्णतः लॉकडाऊन करण्याची मागणी केली होती. तसं पत्रच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं. धारावीतील प्रादुर्भाव वेळीच रोखला गेला नाही तर मुंबईवरही मोठे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महानगरपालिकेने धारावीतील सर्व रुग्णालये ताब्यात घेऊन कोरोना बाधितांसाठी राखीव करावीत. धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा वापर क्वारंटाईन वॉर्ड म्हणून करावा. अशी देखील मागणी करण्यात आलीय.

WEB TITLE - marathi news MUMBAI DHARAVI AREA IS CORONA AFFECTED


संबंधित बातम्या

Saam TV Live