''थेट मुख्यमंत्रिपदाविषयी बोला'' - संजय राऊत

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

मुंबई : आम्हाला कुठल्याही प्रकारचा मसुदा नको, मुख्यमंत्री पदावरच बोला, असा पुनुरुच्चार पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा समसमान वाटप या केलेल्या वक्तव्यावर त्यांच्या निवासस्थानी मसुदा बनविण्यात येत असल्याच्या बातम्या आल्यानंतर संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे.

VIDEO | सेनेच्या आमदारांना रंगशारदामधून अज्ञातस्थळी हलवणार

राऊत म्हणाले, 'आम्हाला कुठल्याही प्रकारचा मसुदा नको, आम्हाला केवळ मुख्यमंत्री पदाबाबतचं पत्र हवं आहे. ते भारतीय जनता पक्षाने द्यावं. त्यानंतरच चर्चा होईल.' निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 15 दिवस उलटत आले तरीही युतीला सरकार स्थापन करण्यास अपयश आले आहे. भाजपा- शिवसेना युतीचे सरकार बनण्यासाठी भाजपाने 50-50 टक्के सत्तेत वाटा देण्याची तयारी दर्शविली आहे. याचा मसुदाही तयार करण्यात आला आहे. हा मसुदा नको तर मुख्यमंत्री पदाबाबतचे अधिकृत पत्र असेल तरच चर्चेला यावे असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

VIDEO | महाराष्ट्रातील आताच्या परिस्थितीवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

दरम्यान, संजय राऊत हे तातडीने राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला आले असून गेल्या आठवडाभरात त्यांनी तिसऱ्यांदा पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट दिली आहे. यामुळे एकीकडे भाजपाचे नेते ठाकरेंकडे जाण्याच्या तयारीत असताना राऊत यांनी पवारांचे निवासस्थान गाठल्याने चर्चेला उधान आले आहे. यातच काही वेळापूर्वी रामदास आठवलेंनी पवार यांची भेट घेतली आहे.

Web Title: dont want draft only talk if there letter cm post says Sanjay Raut

संबंधित बातम्या

Saam TV Live