VIDEO | दुधापेक्षा बियर चांगली ? असं कसं तुम्हीच पाहा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

बियर हे एक अल्कोहोल पदार्थ आहे. मात्र आरोग्यासाठी दूधपेक्षा बियर चांगलाी. असा दावा हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ' च्या एका रिपोर्टमध्ये पेटाने केलाय़.

यापुढं चांगल्या आरोग्यासाठी दूधपेक्षा बियर पिण्याचा कुणी सल्ला दिला तर आश्चर्य वाटू देऊ नका. कारण दूधापेक्षा बियर पिणं फायदेशीर आहे. हे आम्ही नाही तर पेटाचं म्हणणं आहे. एवढच नाही तर दूध न पिण्याचा सल्लाही पेटानं दिलाय. बियर हे एक अल्कोहोल पदार्थ आहे. असं असताना पेटानं केलेल्या या दाव्यानं सगळ्यांनाच धक्का  बसलाय. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ' च्या एका रिपोर्टमध्ये पेटाने हा दावा केलाय़.

रिपोर्टमध्ये पेटानं काय म्हटलंय?
बियर बनवण्यासाठी ज्या वस्तूचा वापर केला जातो. त्यात पोषक तत्वं असतात. गहू, मक्का,तांदळाचा वापर केला जातो ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे.बियरमध्ये ९० टक्के पाण्यासह फायबर, कॅल्शियम, आयरनसह शरीराला फायदेशीर पोषक तत्व असतात. बियरमुळे व्यक्तीचे हाडे मजबूत होतात. शरिरातील मांसपेशींच्या विकासासाठी हे फार फायदेशीर आहे. दररोज दूध प्यायल्याने हृदयरोग, लठ्ठपणा, डायबिटीज आणि कॅन्सर यासारखे आजार होत असल्याचं म्हटलंय.

आपल्याला लहानपणापासून दूध प्यायल्यानं कसा फायदा होतो हे शिकवलं जातं होतं. मात्र पेटाच्या या नव्या दाव्यानं नवा वाद निर्माण झालाय.

Web Title : Drink Beer Is Much Better Then milk


संबंधित बातम्या

Saam TV Live