'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाने पाठविली नोटीस

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 मार्च 2019

मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर येत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठविली आहे.

मोदींच्या लहानपणापासून पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या चित्रपटाचे प्रदर्शन निवडणुकीच्या काळात रोखण्याची मागणी आयोगाकडे केली होती. निवडणूक आयोगाने चित्रपटाच्या निर्मात्यांसह दोन वृत्तपत्रांनाही नोटीस पाठविली आहे. या वृत्तपत्रांनी चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध केले होते. 

सध्या बॉलिवूडमध्ये अनेकांचे बायोपिक बघायला मिळत आहेत. खेळाडू, ऐतिहासिक व्यक्ती तसेच राजकारणातल्या व्यक्ती अशा अनेकांच्या खऱ्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचीही पसंती मिळत आहेत. आता यात पंतप्रधान मोदी यांचा बायोपिकचाही समावेश झाला आहे. या चित्रपटात विवेक ओबेरॉय मोदींची भूमिका साकारत असून, विवेकचे वेगवेगळे नऊ लूक चित्रपटात आहेत. नरेंद्र मोदींवरील हा चित्रपट 5 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिलला मतदान होत असल्याने चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

Web Title: EC sends notice to producers of Bollywood film PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Saam TV Live