एकनाथ खडसे उद्या उद्धव ठाकरेंना भेटणार; खडसे वेगळी भूमिका घेणार?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 डिसेंबर 2019

जळगाव : भाजपचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतले. ते मुंबईकडे रवाना झाले असून मुंबईत उद्या (ता.10) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीहून ते विमानाने मुंबईकडे रवाना झाले आहेत. 

जळगाव : भाजपचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतले. ते मुंबईकडे रवाना झाले असून मुंबईत उद्या (ता.10) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीहून ते विमानाने मुंबईकडे रवाना झाले आहेत. 
एकनाथाव खडसे यांनी भाजपकडून आपल्यावर वारंवार अन्याय होत आहे. जर असाच अन्याय होत राहिल्यास आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. असा ईशारा पक्षाला दिला आहे. आज ते दिल्ली येथे पक्षाच्या नेत्यांना भेटण्यास गेले होते. मात्र केंद्रांतील कोणत्याही नेत्यांची भेट झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र खडसे यांनी दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांची दिल्ली येथील 6 जनपथ निवासस्थानी भेट घेतली. तब्बल तीस मिनीटे त्यांच्याशी चर्चा झाली, मात्र काय चर्चा झाली ते कळू शकलेले नाही. मात्र जळगाव जिल्ह्यातील शेळगाव बॅरेज प्रकल्पासंदर्भात चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटणार 
खडसे यांची दिल्ली येथे दोन दिवसाचा दौरा होता. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते तातडीने विमानाने मुंबईकडे रवाना झाले आहे. रात्री साडे आठवाजेपर्यंत ते मुबंईत पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले. ते राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. शेळगाव बॅरेजच्या प्रकल्पासंदर्भातच ते चर्चा करणाऱ्या असल्याचे सांगण्यात आले. परंतु भाजपवर नाराज असलेल्या खडसेंची राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते शरद पवार यांच्या भेटीनंतर उद्या मुबंईत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट होत असल्याने राज्यातील राजकाणात मोठी खळबळ उडाली आहे. 
 
Web Title:  Eknath Khadse Tomorrow Will Meet Chief Minister Uddhav Thackeray


संबंधित बातम्या

Saam TV Live