येत्या 48 तासांत मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 जुलै 2019

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यानंतर आता हवामान विभागाकडून येत्या 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच जोरदार वाऱ्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, कुर्ला, घाटकोपर या भागासह विक्रोळीत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला. तसेच मोठे वादळ धडकणार असून, या वादळाची तीव्रता 40-50 किमी/प्रतितास असण्याची शक्यता आहे.

याशिवाय या पावसामुळे विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. मच्छिमारांना येत्या काही तासांत सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live