ठरला फॉर्म्युला! 'या' नेत्यांकडे 'ही' मंत्रीपदे

Shivsena, NCP, Congress
Shivsena, NCP, Congress

मुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या बैठकांमधून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात एका फॉर्म्युला निश्चित होत असल्याची माहिती मिळाली आहे. यात 15-15-12 असा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते. 

दिल्लीत आज, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होत आहे. गेल्या सोमवारपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. ते दिल्लीत आल्यापासून सत्ता स्थापनेच्या हालचालींना गती आली. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची दोन वेळा बैठक घेतली. त्याच बरोबर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी त्यांच्या बैठका झाल्या. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनीही चर्चा करून, एक फॉर्म्युला निश्चित केला आहे. यात मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच राहणार असून, शिवसेना राष्ट्रावादीला प्रत्येका 15 खाती तर काँग्रेसच्या वाट्याला 12 मंत्रिपदे मिळणार असल्याची चर्चा आहे.

या खाते वाटपाची चर्चा 

मुख्यमंत्रिपद - शिवसेना - उद्धव ठाकरे 
गृह आणि अर्थ खाते - राष्ट्रवादी काँग्रेस - जयंत पाटील 
उपमुख्यमंत्रिपद किंवा महसूल खाते - काँग्रेस - बाळासाहेब थोरात 
वैद्यकीय शिक्षण खाते - राष्ट्रवादी काँग्रेस - जितेंद्र आव्हाड 
विधानसभा अध्यक्ष - काँग्रेस - पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण
तीन पक्षांची समन्वय समिती
राज्यात तीन पक्षांचे मिळून पाच वर्षे सुरळीत सरकार चालवण्यासाठी तीन पक्षांकडून एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये तीन पक्षांचे मिळून 9 ते 12 सदस्य असण्याची शक्यता आहे. समितीत तिन्ही पक्षांचे निर्णय घेणारे ज्येष्ठ नेते असण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ तर, शिवसेनेकडून, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रामदास कदम यांची तसेच काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण या तीन नेत्यांचा समितीमध्ये समावेश होणार असल्याची चर्चा आहे. 

Web Title: expected portfolio of shiv sena ncp congress government in maharashtra
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com