#MeToo : माझ्यावरही झाला होता लैंगिक अत्याचार : फातिमा सना शेख

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 मार्च 2019

मुंबई : 'दंगल'मध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलेल्या फातिमा सना शेख हिने लैंगिक अत्याचाराबाबत खुलासा केला आहे. एका मुलाखती दरम्याने #MeToo बाबत तुझे मत काय असा प्रश्न विचारला असता, माझ्यासोबतही असा प्रकार घडला आहे, पण त्यावर मी काही बोलू इच्छित नाही असे सांगितले. 

'लैंगिक अत्याचार म्हणजे इतकी सामान्य गोष्ट झालीये की स्त्री काही आवाज न उठवता ते सहन करते. माझ्या आयुष्याशी निगडीत काही गोष्टी मला सार्वजनिकपणे सांगायची इच्छा नाही. माझ्यासोबत जे काही झालं, त्यातून बाहेक पडण्याचा मी प्रयत्न करत आहे व या गोष्टींमुळे कोणी माझ्याबद्दल काही चुकीचे मत निर्माण करून घेऊ नये असे मला वाटते.' असेही फातिमाने यावेळी सांगितले.

यावेळी फातिमाने #MeToo मोहिमेबाबत प्रशंसा केली. यामुळे अनेक मोठी नावे बाहेर आली. महिला मनमोकळेपणाने बोलू लागल्या आहेत. असेही तिने यावेळी सांगितले. #MeToo मोहिमेला तनुश्री दत्ताने सुरवात केली होती. अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर तनुश्रीने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.

Web Title: Fatima Sana shaikh also victim of Sexual abuse

संबंधित बातम्या

Saam TV Live