महाराष्ट्र नवनिर्माण सेना साठी लोकसभेत मोजक्‍या जागा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 फेब्रुवारी 2019

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) लोकसभेच्या मोजक्‍याच जागा लढवणार आहे. 

आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. निवडणूक लढवावी की नाही, लढवल्यास किती जागांवर उमेदवार उभे करावेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीसोबत समझोता करावा का यासारख्या मुद्द्यांवरून मनसेच्या नेत्यांमध्येच संभ्रम आहे. 

राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या नेत्यांच्या बैठकीतून ही बाब समोर आली. प्रचारात पक्षाचे अस्तित्व राहील यासाठी काही मोजक्‍या जागा लढवाव्यात, असे मत मनसेच्या बहुतांश नेत्यांनी व्यक्त केल्याचे समजते. 

Web Title: A few places to fight Maharashtra NavNirman Sena in the Lok Sabha

संबंधित बातम्या

Saam TV Live