'यश मिळण्यासाठी कोल्हे यांच्याकडे मुंबईचे प्रभारीपद द्या'

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 जून 2019

मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मुंबईत यश मिळण्यासाठी नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे मुंबईचे प्रभारीपद देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मुंबईत यश मिळण्यासाठी नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे मुंबईचे प्रभारीपद देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

मुंबईत पक्षाच्या आढावा बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात गुरुवारी आढावा घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्‍यता आहे. यामध्ये तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचेही सांगण्यात येते. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ‘राष्ट्रवादी’कडून मुंबईची जबाबदारी खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे सोपवली जाऊ शकते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. निवडणूक प्रचारावेळी विशेषत: तरुण वर्गात त्यांचा मोठा बोलबाला दिसून आला होता. 

Web Title: Give Kolhe the responsibility of Mumbai

संबंधित बातम्या

Saam TV Live