मुंबई: राज्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यावर सर्वच नेते निवांत झालेले दिसत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे याही मतदान झाल्यावर प्रचारातून निवांत झाल्या असून सध्या त्या नातेवाईक आणि जवळच्या लोकांना भेटण्यासाठी वेळ देत असतानाचा त्यांच्या घरी एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. या नवीन पाहुण्याचे नाव लुका सुळे असे ठेवण्यात आले आहे.
लुका सुळे हा दुसरा कोणी नसून हा लाह्सा ओप्सा जातीचा कुत्रा आहे. त्याचे मूळ तिबेट देशात आहे. या कुत्र्याचे वजन साधारणत: 7 ते 8 किलो असते. या जातीच्या कुत्र्यांची वयोमर्यादा 12 ते 14 वर्षे आहे. हा कुत्रा सुप्रिया सुळे यांना त्यांचे मित्र संतोष यांनी भेट दिला असून, ही माहिती त्यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरून दिली आहे.
दरम्यान, 23 मेला लोकसभेचा निकाल असून सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यांना भाजपच्या कांचन कूल यांनी तगडे आव्हान दिले असून, बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय लागेल याबाबत वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत.
Web Title: Supriya Sule Welcomes new Guest in her family
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.