मुंबईत उकाडा ; कोकणात धुक्याची चादर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

एकीकडे मराठवाड्यात दुष्काळाची झळ पाहायला मिळतेय, तर इकडे मुंबईत उकाडा चांगलाच वाढलाय. मात्र कोकणातील तालुक्यांमध्ये धुक्याची चादर पाहायला मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. वातावरणात असलेली आर्द्रता आणि सरासरी तापमानाहून अधिक तापमान यामुळे घामाघूम होत मुंबईकरांचा प्रवास सध्या सुरू आहे.

महाराष्ट्राच्या उत्तरेतील काही भागातून बुधवारी मान्सूनने माघार घेतली. एकीकडे परतीच्या पावसाने अधूनमधून उसंत घेतली असली तरी दुसरीकडे मात्र पहाटे पहाटे दाट धुक्याची चादर आलेली पहायला मिळतेय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश सर्वच भागात रात्री आणि सकाळीही हीच स्थिती आहे. या वातावरण बदलामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होताना पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग स्वाईन फ्लूचा एक रुग्ण आढळून आलाय. 

WEB TITLE : MARATHI NEWS MUMBAI HEAT CITIZENS OF KONKAN ENJOYING FOG 

संबंधित बातम्या

Saam TV Live