मुंबईला पावसाने झोडपलं; लालबाग परिसरात दुकानांमध्ये शिरलं पाणी  

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 जुलै 2018

मुंबईला पावसानं झोडपून काढलंय. भायखळा, लालबाग, परळ, हिंदमाता या भागांमध्ये नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. मुंबईतील लालबाग परिसरात काही दुकानांमध्ये पाणी शिरलंय. साचलेल्या पाण्यामुळे या भागातील रस्ते वाहतूक बंद करण्यात आली आहे.

भायखळा, लालबाग, परळ, हिंदमाता या भागांमध्ये गुडघाभर पाणी साचलंय.  मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर आणि फुटपाथवर पाणी साचल्यामुळे मुंबईकर जीव धोक्यात घालून पायपीट करतानाही पाहायला मिळतायत.

मुसळधार पावसाचा मुंबईतील रेल्वेवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. पश्चिम रेल्वे पूर्णतः कोलमडली आहे. त्याचबरोबर मध्य रेल्वेच्या सायन माटुंगा स्टेशनवर रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा धीम्या गतीने सुरु आहे.      

संबंधित बातम्या

Saam TV Live