सण येत-जात राहतील; पण उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही - मुंबई हायकोर्ट 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

गणपती बाप्पाच्या निरोपाच्या वेळी निघणाऱ्या विर्सजन मिरवणुकीत यंदाही डीजेवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. डीजेला सर्वोच्च न्यायालयानेच बंदी कायम ठेवल्याने गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

"सण येत-जात राहतील; पण उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही", अशा शब्दांत उच्च न्यायालयाने डीजे मालकांना सुनावले होते. तर राज्य सरकारनेही डीजे वाजवण्यास ठाम विरोध दर्शवला होता.

त्यामुळे यंदा गणपती बाप्पाच्या निरोपावेळी डीजेवर थिरकणारी पावले यंदा दिसणार नसल्याने ती कमी भरून काढण्यासाठी बँड पथकांची मदत घेतली जाणार आहे. दरम्यान कोर्टाच्या या निर्णयानंतर, डॉल्बी वाजवण्यावर ठाम असणारे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले काय भूमिका घेतात याकडेच सर्वांचं लक्षं लागलेलं आहे.

WebTitle : marathi news mumbai high court continues ban on dj during ganesh immersion 

संबंधित बातम्या

Saam TV Live