VIDEO | संजय राऊत यांचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल... | संजय राऊत पत्रकार परिषद |

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

मुंबई : 'भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रपती राजवटीची भाषा करून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. आधी ईडी व आता राष्ट्रपतींना या विषयात आणून ते धमकीची भाषा करत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात सत्तास्थापन करण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे अशी भाषा करणे साफ चुकीचे आहे.' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

'राष्ट्रपती कोणी वैयक्तिक नसून ती संस्था आहे व राष्ट्रपती कोणाच्याही खिशात नाहीत, त्यामुळे भाजपने अशी भाषा करणे अत्यंत अपमानास्पद आहे. असे बोलून भाजप राष्ट्रपतींचा व त्यांच्या पदाचा गैरवापर करत आहेत. भाजपला बहुमताची जमवाजमव करता आली नाही म्हणून शेवटचे हत्यार म्हणून राष्ट्रपती राजवटीची भाषा ते करत आहेत. महाराष्ट्रात कोणाचे सरकार स्थापन होणार हे महाराष्ट्रातच ठरेल. बाहेरचे कोणीही हे ठरवू शकत नाहीत आणि आम्ही शेवटपर्यंत युतीधर्माचे पालन करू.'

अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी काल (ता. 1) 9 नोव्हेंबरपर्यंत सत्तास्थापन करता न आल्यास राष्ट्रपती राजवट लागू होईल असे वक्तव्य केले होते. यावर प्रत्युत्तर देताना राऊतांनी सांगितले की अशी धमकी देणे हे राज्यासाठी अत्यंत अपमानास्पद आहे. कोणत्याही धमकीचा आमच्यावर परिणाम होणार नाही. जो पक्ष बहुमत आणि 145 उमेदवारांची यादी घेऊन येईल तोच सत्ता स्थापन करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पवार भेटीवर काय म्हणाले राऊत?
शरद पवार व मी नेहमीच भेट असतो. सामाजिक व्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न यांवर आमची चर्चा होत असते. त्यामुळे यामागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत पुढे जायचे की नाही याबाबत काही निर्णय नाही. 

Web Title: Shivsena MP Sanjay Raut Criticizes on Bjp at PC

संबंधित बातम्या

Saam TV Live