Mumbai | #CAA विरोधात ऑगस्ट क्रांती मैदानात होणार आंदोलन

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

गेले काही दिवसांपूर्वी CAA म्हणजेच सुधारित नागरिकत्त्व कायदा देशाच्या संसदेत पारित करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर देशभरात तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळतायत. सर्वात आधी ईशान्य भारतातील राज्यांमधून तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. त्या पाठोपाठ पश्चिम बंगाल दिल्ली मुंबई सगळीकडेच CAA ( Citizen Amendment Act) सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात अतिशय तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळालेत.   

गेले काही दिवसांपूर्वी CAA म्हणजेच सुधारित नागरिकत्त्व कायदा देशाच्या संसदेत पारित करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर देशभरात तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळतायत. सर्वात आधी ईशान्य भारतातील राज्यांमधून तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. त्या पाठोपाठ पश्चिम बंगाल दिल्ली मुंबई सगळीकडेच CAA ( Citizen Amendment Act) सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात अतिशय तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळालेत.   

याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठात देखील आंदोलनं करण्यात आलं. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात CAA विरोधात एक आंदोलन आयोजित करण्यात आलं. यावर बॉलीवूड अभिनेते देखील यावर आपला उठवताना पाहायला मिळतायत. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ऑगस्ट क्रांती मैदानाकडे जाणारे सगळे रस्ते बंद केलेत. मुंबई पोलिसांनी याबद्दल ट्विटरून माहिती दिली आहे..  

मुंबई पोलिसांच्या या ट्विटर पोस्टनंतर बॉलीवूड अभिनेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला सुरवात केलीये. 
 

मोठ्या प्रमाणात मुंबईकर ऑगस्ट क्रांती मैदानात दाखल झालेत. अजूनही लोकं इथे येतायत आणि CAA बद्दल मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात येतेय. दरम्यान आज होणाऱ्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील इंटरनेट सुविधा देखील देखील बंद करण्यात येणार असल्याची माहिती समोर येताना दिसतेय. मात्र याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही.  दरम्यान ऑगस्ट क्रांती मैदानावरील केम्स कॉर्नर ते नाना चौक पर्यंतचा मार्ग तात्पुरता पूर्णतः बंद ठेवण्यात आलाय. त्यामुळे आता ईशान्य भारतातून पेटलेली आंदोलनाची ही ठिणगी मुंबईत देखील पेटण्याची शक्यता आहे.

लखनौमध्ये  आंदोलनाला हिंसक वळण : 

CAA च्या विरोधात लखनौमध्ये आंदोलन करणयात आलंय. या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. परिसरात दगडफेकीच्या घटना घडल्या. परिसरात 144 कलम लावण्यात आलंय लखनऊमध्ये हिंसक आंदोलन. आंदोलनामुळं हरियाणातील रस्त्यांवरील वाहतूक जाम

नागपुरात मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर 

CAA | नागरिकत्वविरोधात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले...

नागपुरात नागरिकत्व कायद्याविरोधात मुस्लिम नागरिकांनी जोरदार निदर्शनं केली. मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरले होते. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडून नये यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

कर्नाटकमध्ये डाव्या संघटना रस्त्यावर

कर्नाटकमध्येही नागरिकत्व कायद्याविरोधात डाव्या संघटना रस्त्यावर उतरल्यात. बंगळुरुमध्ये मात्र पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय. यावेळी आंदोलन करणारे इतिहासकार रामचंद्र गुहा यांनाही ताब्यात घेण्यात आलंय.. शहराच्या मैसूर बँक सर्कल परिसरात आंदोलकांना ताब्यात घेतलंय.. तसंच शहरात कलम 144 लागू करण्यात आलंय..

मालेगावातही आंदोलन सुरु

नागरिकत्त्व सुधारणा कायद्याविरोधात मालेगावात हजारो नागरिकांनी आंदोलन सुरु केलंय. इथल्या दस्तुर ए हिंद बचाव कमिटीच्या वतीनं हे आंदोलन पुकारण्यात आलंय. शहराच्या मुख्य भागातून या नागरिकांनी रॅली काढली. मात्र त्यांना शहिदो की यादगार या ठिकाणी पोलिसांनी अडवलं. त्यामुळं शहराला जनसागराचं रुप आलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे संपूर्ण शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केलाय.

Webtitle : huge mob gathers at august kranti maidan to protest against citizen amendment act


संबंधित बातम्या

Saam TV Live