(VIDEO) मुंबईतील बराचश्या नर्सिंग होम्समध्ये अग्निशमन यंत्रणाच नाही  

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी मुंबईतील अनधिकृत नर्सिंग होमची तपासणी करण्याचे निर्देश अग्निशमन दलाला दिले आहेत.

मुंबईत दिवसागणिक आगीच्या घटना वाढतायत.  त्यात मोठी जीवित हानी होतेय अशा वेळी मुंबईतील 816 नर्सिंग होम अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. आणि या नर्सिंग होममध्ये कोणतीही अग्निशमन यंत्रणा नसल्याचीही धक्कादायक माहिती समोर आलीये. 

आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी मुंबईतील अनधिकृत नर्सिंग होमची तपासणी करण्याचे निर्देश अग्निशमन दलाला दिले आहेत.

काही वॉर्डांमध्ये तपासणीचे काम सुरू झाले आहे. अनधिकृत असूनही असे नर्सिंग होम सुरू आहेत. काही नर्सिंग होमचे परवाने संपले असतानाही ते सुरूच आहेत. सर्व अनधिकृतपणे चालणाऱ्या नर्सिंग होममध्ये अग्निशमन यंत्रणाच नसल्याची माहिती समोर आली आहे.  

संबंधित बातम्या

Saam TV Live