सर्वसामान्यांसाठी खुशखबर! IRCTC देणार 'ही' खुशखबर..

सर्वसामान्यांसाठी खुशखबर!  IRCTC देणार 'ही' खुशखबर..

मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टुरिझमने (IRCTC) मार्च 2020 पर्यंत मुंबई सेंट्रल येथे छोट्या आकाराचे पॉड हॉटेल प्रवाशांसाठी खुले करण्याचे नियोजन केले आहे. हे हॉटेल सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये राहणार असून सुखसोईंनी सुसज्ज अशा छोट्या आकारातील हॉटेल उभारण्यात येणार आहे. 
 
अशा असतील हॉटेलमध्ये सुविधा 

नागरिकांच्या सुरक्षेसाठी हॉटेलमध्ये CCTV, स्वच्छतागृह, कॉफी शॉप अशा अन्य सुविधा असतील. संपूर्ण खोल्या वातानुकूलित असतात. कॅप्सूलच्या आकाराच्या या खोल्या असल्याने या खोल्यांना पॉड हॉटेल असेही बोलले जाते. असे आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

रेल्वे स्थानक परिसरातील खासगी हॉटेलचे दर आवाक्‍याबाहेर असल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर त्रास सहन करावा लागतो. यामुळे परवडणाऱ्या दरात सुरक्षित आणि आरामदायी सुविधा देण्यासाठी पॉड हॉटेल सुरू करण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला.

मुंबई सेंट्रल येथे पॉड हॉटेलसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या ठिकाणासाठी बुधवारी 18 डिसेंबरला निविदा उघडण्यात येतील. ठेकेदार नियुक्त केल्यानंतर साधारणपणे दोन ते तीन महिन्यांचा कालावधी पॉड हॉटेलच्या उभारणीसाठी देण्यात येईल.

मार्चपर्यंत मुंबई सेंट्रल येथे 25 खोल्यांचे पॉड हॉटेल उभारण्याचे नियोजन आहे. हॉटेल सुरू झाल्यानंतर 12 तासांसाठी प्रवाशांना या खोल्या भाड्याने देण्यात येतील, अशी माहिती आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

WebTitle : IRCTC has a good news for the people in mumbai check what is this service

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com