6 ते 20 एप्रिलदरम्यान होणार "जेईई मेन-2" परीक्षा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 जानेवारी 2019

मुंबई - अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली "जेईई मेन'ची दुसरी ऑनलाइन परीक्षा 6 ते 20 एप्रिलदरम्यान होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना 8 फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी करता येईल.

मुंबई - अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली "जेईई मेन'ची दुसरी ऑनलाइन परीक्षा 6 ते 20 एप्रिलदरम्यान होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना 8 फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी करता येईल.

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी आवश्‍यक असलेली "जेईई मेन' परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जानेवारीत झालेल्या पहिल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यानंतर दुसऱ्या परीक्षेसाठी नोंदणी सुरू होणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या (एनटीए) वतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

"जेईई मेन-1' परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनाही "जेईई मेन-2' ही परीक्षा देता येईल. या दोन्ही परीक्षांना बसण्याची संधी यंदा पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना मिळाली आहे. सर्वाधिक गुण मिळालेल्या परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेश दिला जाईल. "जेईई मेन-2' परीक्षेसाठी नोंदणी 7 मार्चपर्यंत सुरू राहील आणि 8 मार्चपर्यंत नोंदणी शुल्क भरता येईल. निकाल 30 एप्रिलला जाहीर होणे अपेक्षित आहे.

Web Title:  "JEE Main-2" exam to be held from April 6 to 20


संबंधित बातम्या

Saam TV Live