'तान्हाजी' च्या दिग्दर्शकाला जितेंद्र आव्हाडांची धमकी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

सध्या जोरदार चर्चा आहे ती ओम राऊत यांचा आगामी चित्रपट तान्हाजी यांची. एखादा ऐतिहासिक चित्रपट आला की त्या संबंधीचे वाद-विवाद हे जोडून येणं हे आता काही नवीन राहिलेलं नाही. अशातच आता येऊ घातलेल्या तान्हाजी सिनेमाबद्दल असंच पाहायला मिळतंय.   

आगामी "तान्हाजी" या चित्रपटात संत रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांना काहीतरी 'फेकून' मारलेल दाखवलंय गेलेलं. यावर आता सर्वच स्तरातून आक्षेप घेतला जातोय. आता या सिनेमाबाबत राष्ट्रवादीचे आमदार आणि जेष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतलीये. 

ओम राऊत तुमच्या तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला , त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल. याला धमकी समजली तरी चालेल. या शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी ओम राउत यांना सुनावलंय. 

दरम्यान, याआधी संभाजी ब्रिगेड ने देखील यावर आक्षेप घेतलाय. " प्रत्येक चित्रपटात काहीतरी गंभीर आणि चुकीचं, वादग्रस्त दाखवून सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात जातो. या चित्रपटातून हा प्रसंग वगळला गेला पाहिजे." अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.  

'गड आला, पण सिंह गेला' असं शिवरायांच्या ज्या मावळ्याचं वर्णन केलं जातं, त्या तानाजी मालुसरे याच्यावर आधारित 'तान्हाजी' हा सिनेमा येऊ घातलाय. या सिनेमाचे प्रमोशनल फोटो आणि ट्रेलरला सर्वांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. अगदी काही दिवसातच या ट्रेलरने लोकांना वेड लावलंय असं म्हटलं तर वावगं  नाही.  दरम्यान आता यासंबंधीचे वाद विवाद आता डोकं वर काढताना पाहायला मिळतायत.

Webtitle : jeetendra awhad on controversial shots of tanhaji movie of om raut  

संबंधित बातम्या

Saam TV Live