जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली खोचक टीका

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 24 जानेवारी 2019

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पुढे एखादा 'गुजरातचा मोगली' नावाचा चित्रपट काढतील? अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकांना माहिती नाही, की मी दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये जंगलात जायचो. तिथे कोणीतीही व्यक्ती नव्हती तिथे फक्त स्वच्छ पाणी असायचे, असे वक्तव्य केले होते, यावरून जितेंद्र आव्हाड यांनी ही टीका केली आहे.

पाच दिवसांसाठी आवश्यक अन्न मी न्यायचो. तेथे कोणतेही वर्तमानपत्र, रे़डिओ नव्हते. त्यावेळी कोणतीही टीव्ही किंवा इंटरनेट यांपैकी काहीही उपलब्ध नव्हते, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होती. 

जंगलात राहत होतात तर आता याला अनुसरून 'गुजरातचा मोगली' असा काही चित्रपट काढण्याचा विचार आहे काय? अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

Web Title: Jitendra Awhad has made critic on Prime Minister Narendra Modi

संबंधित बातम्या

Saam TV Live