मुंबईतही धुक्याची चादर; कोकणातल्या पायवाटही हरवल्या दव आणि धुक्यात 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

नेहमीच उष्णतेची जाणीव करून देणाऱ्या मुंबईतही धुक्याची चादर पाहायला मिळालीय. सकाळच्या सुमारास पडलेल्या या धुक्यामुळे मुंबईकरांना सुखद धक्का मिळालाय. धुक्यामुळे वातावरणात थोडासा गारवाही अनुभवता आला. या धुक्यामुळे मुंबईकरांना आता थंडीची चाहूल लागलीय.

दरम्यान, राज्यातून पाऊस परतल्यानंतर उकाडाही चांगलाच वाढलाय. तर दुसरीकडे कोकणातील तालुक्यांमध्ये धुक्याची चादर पाहायला मिळतेय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश सर्वच भागात रात्री आणि सकाळीही हीच स्थिती आहे.

गेले दोन दिवस वातावरणातील गारवा वाढत असतानाच थपथपणाऱ्या दवामुळे, कोकणातील वातावरण आल्हाददायक बनले असून. सोबत असणाऱ्या दाट धुक्यात पायवाटांसह रस्तेही हरवून जात आहेत.

WebTitle : marathi news mumbai konkan witness fog in the morning 

संबंधित बातम्या

Saam TV Live