काँग्रेसला विधानसभेतील विरोधी पक्षनेतेचा मान मिळणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 जून 2019

मुंबई - विधानसभेतील विरोधी पक्षांच्या सदस्य संख्येचा विचार केला तर सध्या रिक्‍त असलेल्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसच्या सदस्याचीच वर्णी लागणार असल्याचे निश्‍चित आहे. विधानसभेत काँग्रेसचे सध्या चाळीस, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३९ सदस्य आहेत. त्यामुळे काँग्रेसला विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा मान मिळणार असून, ही संधी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार बाळासाहेब थोरात यांना मिळण्याची दाट शक्‍यता आहे.

गेली साडेचार वर्षे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळलेले काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्‍त झाले आहे. 

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ४२, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ सदस्य निवडून आले होते. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावर विखे यांची निवड झाली होती. मात्र, सध्या विखे यांच्यासह काँग्रेसचे मराठवाड्यातील आमदार अब्दुल सत्तार यांनी विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ ४० झाले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुक्‍याचे आमदार हनुमंत डोळस यांचे निधन झाले, तर ‘राष्ट्रवादी’चे बीड जिल्ह्यातील आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे ‘राष्ट्रवादी’चे विधानसभेतील संख्याबळ दोनने कमी होउन ते ३९ इतके झाले आहे. संख्याबळाचा विचार केला तर काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी दोन्ही काँग्रेसच्या आघाडीच्या गोटात खेळीमेळीचे वातावरण राहावे, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत सकारात्मक संदेश जावा, म्हणून राष्ट्रवादी विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार नाही.

नीलम गोऱ्हे उपसभापतिपदी शक्‍य
विधान परिषदेचे उपसभापतिपद सध्या रिक्‍त आहे. या जागी नीलम गोऱ्हे यांची निवड होण्याची शक्‍यता आहे. या अधिवेशनात सभापती, उपसभापतिपदाच्या निवडीची घोषणा करणार असल्याचे समजते.

विधानसभेत...
४० - काँग्रेसचे आमदार
३९ - ‘राष्ट्रवादी’चे आमदार

Web Title: The Leader of the Opposition Leader in the Legislative Assembly of the Congress

संबंधित बातम्या

Saam TV Live