गानसम्राज्ञी लता मंगेशकर रुग्णालयात दाखल; प्रकृती खालावली

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

मुंबईः जगप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे आज (सोमवार) सकाळी ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर (कृत्रिम श्वासोच्छवास) ठेवण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लतादीदींना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यामुळे पहाटे दीडच्या सुमारास त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

लतादीदींच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, दीदींची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान, लतादीदींनी 28 सप्टेंबर 90वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त त्यांना बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Legendary singer Lata Mangeshkar hospitalised
 
संबंधित बातम्या

Saam TV Live