मुंबईत लेप्टोस्पायरोसिसचा दुसरा बळी..

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 जून 2018

मुंबईत लेप्टोस्पायरोसिसचा दुसरा बळी गेल्यानं आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. बुधवारी कुर्ल्यात एक 15 वर्षीय मुलाचा लेप्टोस्पायरोसिसमुळे मृत्यू झाला होता. तर आता गोवंडीमध्येही इम्तियाज मोहम्मद अली या इसमाचा मृत्यू झालाय. त्यामुळे आतापर्यंतचा हा लेप्टोस्पायरोसिसचा दुसरा बळी ठरलाय.

या दोन्ही घटनांनी मुंबईतील आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर आणलाय. दोन दिवसांपूर्वीच मुंबईकरांना दूषित पाण्यातून संसर्ग झाल्याचं सांगण्यात आलं होता. त्यामुळे अनेकांना ताप, सर्दी खोकला यांसारखे अनेक आजार झाल्याचंही चित्रंय. दरम्यान, आता लेप्टोस्पायरोसिसनंही डोकं वर काढल्यानं मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतंय. 

लेप्टोस्पायरोसिस हा आजार कुत्रा, उंदीर यांसारख्या प्राण्यांमुळे जास्त पसरतो. खूप पाऊस पडल्यावर पाणी साचतं. काही वेळा पूर येतो. अशा साचलेल्या पाण्यात प्राण्यांच्या  लघवीतील बॅक्टरीया मिसळतात आणि त्यामुळे इन्फेकशन पसरतं.

संबंधित बातम्या

Saam TV Live