24 तासांपासून ठप्प असलेली भाईंदर-विरार लोकलसेवा कासवगतीने पूर्वपदावर 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 जुलै 2018

मुसळधार पावसामुळे ठप्प असलेली भाईंदर-विरार लोकलसेवा अतिशय धीम्या गतीनं का होईना, पण सुरु झाली आहे. पश्चिम रेल्वे व्यवस्थापनाकडून युद्धुपातळीवर वाहतूक पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असून त्या तयारीचाच भाग म्हणून, विरारहून चर्चगेटच्या दिशेने लोकल रवाना करण्यात आली आहे.

सकाळी साडे आठच्या सुमारास विरारवरुन चर्चगेटसाठी जाणाऱ्या लोकल सोडण्यात आल्या आहेत. मात्र रुळांवर काही प्रमाणात अजूनही पाणी असल्यामुळे लोकल फक्त 10 किलोमीटर प्रतीतास या वेगानं चालवल्या जात आहेत. पाणी ओसल्यावर रेल्वे सुरळीत होईल, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

नालासोपारा  आणि वसई स्थानकावर अद्यापही पाणी साचलेलं असून पाण्याचा निचरा करण्याकरता ठिकठिकाणी पंप लावण्यात आले आहेत. नालासोपारा स्टेशन परिसरात तर 20 पंप अहोरात्र कार्यरत आहेत. दरम्यान विरार-डहाणू मार्गिकाही संथगतीने सुरू झाली आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live