मुले पळवणारी टोळी मुंबईतही

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 मार्च 2019

मुंबई - ईशान्य मुंबई व पालघर या मतदारसंघांची सेना-भाजपमध्ये अदलाबदल होण्याची कुजबूज सुरू झाल्याने पूर्व उपनगरांत त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. भाजपच्या घाटकोपरमधील एका वजनदार नेत्याच्या पुत्राला शिवसेनेच्या कोट्यातून तिकीट मिळण्याची चर्चा सुरू आहे. भाजपचा हा नेता कोण, यावर कोणीही ‘प्रकाश’ टाकू शकले नाही; तर सेनेतील शिशिर शिंदे, सुनील राऊत, तसेच अशोक पाटील यांच्याही नावांची चाचपणी सुरू झाली. 

नेत्यांकडून रातोरात पक्ष बदलले जात आहेत. आज सकाळपासून घाटकोपरमध्ये विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वेगळीच चर्चा सुरू होती. पालघर भाजपला आणि ईशान्य मुंबई शिवसेनेला सोडल्यास ईशान्य मुंबईत शिवसेनेच्या तिकिटावर भाजपच्या एका हेवीवेट नेत्याच्या मुलाला तिकीट दिले जाण्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे मुले पळवणारी टोळी येथेही सक्रिय झाली का? अशी गमतीदार चर्चा सुरू झाली.    

उद्धव ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे सोमय्यांना ईशान्य मुंबईतील शिवसैनिकांनी कडाडून विरोध केला आहे. सोमय्या सोडून कोणताही उमेदवार द्या, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. त्यामुळे दुसरा उमेदवार कोण? याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title: Loksabha Election 2019 BjP Shivsena Candidate Politics

संबंधित बातम्या

Saam TV Live