लोकसभा निवडणुकीकरिता महाराष्ट्रात सुमारे तीन लाख शाईच्या बाटल्या 

लोकसभा निवडणुकीकरिता महाराष्ट्रात सुमारे तीन लाख शाईच्या बाटल्या 

मुंबई - लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात सुमारे तीन लाख शाईच्या बाटल्या लागणार असून, त्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात
आले आहे.

मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारा हा काळा ठिपका निवडणुकांचा अविभाज्य असा घटक बनला आहे. या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकरिता महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांमध्ये पावणेनऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता निवडणूक आयोगामार्फत सुमारे ३ लाख शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली होती. या सर्व बाटल्या राज्याला मिळाल्या असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. ही शाई म्हैसूर पेंटस्‌ कंपनीमार्फत बनवली जाते. राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये सुमारे ९५ हजार मतदान केंद्र असून, त्यावर या शाईच्या बाटल्या त्याचबरोबर मतदानासाठी आवश्‍यक ते साहित्य पुढील आठवड्यात पोच करण्यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत प्रयत्न सुरू आहेत.

अशी आहे प्रक्रिया
मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदानापूर्वी मतदान केंद्र अधिकारी मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली नाही, याची तपासणी करतात. जी व्यक्ती ही तपासणी करू देत नाही ते मतदानासाठी अपात्र असल्याचे मतदान अधिकारी सांगू शकतात. जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल, तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.

राज्यात मतदान
४८ एकूण मतदारसंघ
८.७५ कोटी एकूण मतदार
९५ हजार मतदान केंद्रे
३ लाख शाईच्या बाटल्या

Web Title: Loksabha Election 2019 Ink bottle 3 lakh

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com