महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची  सोशल मीडियाद्वारे  युतीला लक्ष्य करण्यास सुरवात

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 मार्च 2019

मुंबई - देशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांना हद्दपार करण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर मनसैनिक मैदानात उतरले आहेत. त्यांनी सोशल मीडियातून युतीला लक्ष्य करण्यास सुरवात केली असून त्यांच्या ट्विटना प्रतिसाद मिळत आहे.

कोल्हापूरमध्ये रविवारी भाजप-शिवसेना युतीच्या पहिल्या प्रचार सभेचा नारळ फुटला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर टीका करत राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावर मनसेनेही प्रत्युत्तर दिले आहे. स्वतः अर्धी चड्डी घालणाऱ्यांनी आमच्या कपड्यांची काळजी करू नये, असे ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून केले आहे.

मनसैनिकांनी ट्विटरवरून केलेल्या पोस्ट
    अनिल शिदोरे - ५६ पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही, असे फडणवीस म्हणाले. मग आताचे मोदी सरकार आहे ते काय एकट्या भाजपचे आहे का? आणि आता भाजप एकटाच लढतोय का?

    राज टी फॅन क्‍लब - २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना पुण्यातून मनसेला ९० हजार मते मिळाली होती, ही मते जय-पराजय ठरवू शकत नाहीत, असे ज्यांना वाटते त्यांना राजकारण खूपच समजत असावे.

Web Title: Loksabha Election 2019 MNS Social Media War Politics

संबंधित बातम्या

Saam TV Live