14 जूनला होणार राज्य मंत्रिमंडळ विस्तार जवळपास निश्चित - सूत्रांची माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 जून 2019

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 14 जूनला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे संकेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (मंगळवार) दिले. तसेच या विस्तारात महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेसह इतर काही पक्षांनाही संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे सांगितले होते. त्यानंतर आता येत्या 14 जूनला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विविध राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बैठक घेतली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले होते.  

भाजपच्या मुख्यालयात महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड येथील आगामी विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात अमित शहा यांनी बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र भाजपच्या कोअर समितीचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Cabinet Expansion may be on 14th June

संबंधित बातम्या

Saam TV Live