वांद्र्यातील गरीबनगर झोपडपट्टीत भीषण आग

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

मुंबई - मुंबईतील वांद्रे भागातील गरीबनगर झोपडपट्टीत भीषण आग लागल्याची घटना आज(ता.30) घडली आहे. मुंबई बांद्रा नर्गिस दत्त रोडवर ही झोपडपट्टी आहे. अग्निशामक दलाच्या 10 ते 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकऱ्यांनी दिली आहे. आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट आहेत. याआधीही ऑक्टोबर 2017 मध्ये वांद्रेमधील गरीबनगर झोपडपट्टीत भीषण आग लागली होती. या आगीत शेकडो झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. वांद्रे पश्चिमेकडे ही आग लागली असून 50 हून अधिक झोपड्या या परिसरात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live