बाळाची भूक भागवण्यासाठी बाबा बनला आई...

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

नवी दिल्लीः कन्या भूकेने व्याकूळ होऊन रडत होती. तिचे रडणे बाबांना पाहवत नव्हते. अखेर बाबांच्या 'छाती'मधून दुध आले आणि कन्येची भूक भागवली गेली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर आठ सेंकदाच्या व्हिडिओ व्हायरल होत असून, पित्याच्या कल्पकतेला नेटिझन्सनी दाद दिली आहे. हजारो नेटिझन्सनी व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

'एका कन्येची माता कामानिमित्त बाहेर गेली होती. कन्या भूक लागल्यामुळे मोठमोठ्याने रडत होती. तिच्या वडिलांनी तिला बाटलीमधून दुध पाजण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती पित नव्हती. शिवाय, भूक लागल्यामुळे जोरजोरात रडतही होती. तिच्या रडण्यामुळे वडीलही रडू लागले. शेवटी, तिच्या वडिलांनी दुधाची बाटली शर्टच्या आतमध्ये ठेवली व छातीमधून बाळाला दुध पाजले. मुलगी दुध पिल्यानंतर शांत झाली,' असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

दरम्यान, संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलांसह पुरुषांनीही पित्याचे कौतुक केले आहे.

Web Title: man breast feeds baby in adorable viral video

संबंधित बातम्या

Saam TV Live