मंत्रिमंडळात 'हे' असतील संभाव्य चेहरे...

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

मुंबई - राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. त्यामुळे राज्याच्या नव्या सत्तासमीकरणात शिवसेनेसह दोन्ही काँग्रेस सहभागी होणार असून, नवीन सरकारमध्ये या पक्षांकडून प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न होणार आहे.

राज्यातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष भाजप सत्तेपासून दूर गेल्यानंतर शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येणार आहे. या सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नेते मंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. तसेच, तरुणांचे नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्यासाठी शिवसेनेचे नेते आग्रही आहेत. शिवसेनेच्या मंत्रिमंडळात जुन्यांसह नव्याने निवडून आलेल्या नेत्यांचा समावेश असेल.

शिवसेनेकडून महिला प्रतिनिधी म्हणनू प्रा. मनीषा कायंदे यांचे नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड केल्याने त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्‍यता कमी आहे.
 
Web Title: Mantrimandal government MLA shivsena ncp congress Politics

संबंधित बातम्या

Saam TV Live