Mumbai Marathon : ड्रीम रनमध्ये धावले हजारो स्पर्धक; 'अर्ध'मध्ये तीर्थ पुरण विजेता

Mumbai Marathon : ड्रीम रनमध्ये धावले हजारो स्पर्धक; 'अर्ध'मध्ये तीर्थ पुरण विजेता

मुंबई : कडाक्याची थंडी अनुभवत असलेले हजारो मुंबईकर आज (रविवार) पहाटेच रस्त्यावर उतरले अन् तंदुरुस्तीचा संदेश देत मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. ड्रीम रनमध्ये हजारो स्पर्धकांना सहभाग घेत उत्साह दाखविला. या स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी बॉलिवूड कलाकारही उपस्थित होते. 

Mumbai: CM Uddhav Thackeray flagged off the Dream Run of the 17th edition of the Mumbai Marathon today. Actor Rahul Bose is also participating in the Dream Run. Lyricist Gulzar was also present with the children during the run. pic.twitter.com/0SkTlY1z8A

— ANI (@ANI) January 19, 2020

17 व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये आज (रविवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखविला. प्रत्येक वर्षाच्या तिसऱ्या रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धा होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून स्पर्धेला सुरुवात झाली. तर वरळी येथून हाफ मॅरेथॉनची सुरूवात झाली. ४ लाख २० हजार यूएस डॉलर बक्षिस रक्कम असून या स्पर्धेत मुख्य स्पर्धेतील तीन परदेशी धावपटूंना अनुक्रमे ४५ हजार डॉलर, २५ हजार डॉलर आणि १७ हजार डॉलर रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. तर भारतीय स्पर्धकांना ५ लाख, ४ लाख, ३ लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.

Amazing to see so many enthusiastic people to turn up for the Half Marathon of @TataMumMarathon ! What electric atmosphere. Honour to flag off the Half Marathon this morning. pic.twitter.com/CS5enHRMtf

— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 19, 2020

मुंबई मॅरेथॉनसाठी देश-विदेशातील अव्वल धावपटूंसह हौशी स्पर्धकांनीही या स्पर्धेत भाग घेतला आहे. मुंबई मॅरेथॉनमध्ये सुमारे 55 हजार स्पर्धक सहभागी झाले आहेत. अर्ध मॅरेथॉनमध्ये तीर्थ पुरणने पुरुष गटात, तर महिला गटात उत्तर प्रदेशच्या पारुल चौधरीने सुवर्णपदक मिळविले.

मुंबई मॅरेथॉन ही भारतीयांसाठी प्रामुख्याने ऑलिंपिक पात्रतेसाठी महत्त्वाची स्पर्धा असते, पण या स्पर्धेतून भारतीय स्पर्धकांसाठी ऑलिंपिक पात्रता कमालीची अवघड असल्याचे भारतीय ऍथलेटिक्‍स अभ्यासक मान्य करीत आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सूचनेनुसार आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स महासंघाने टोकियोतील मॅरेथॉनमधील स्पर्धक मर्यादा घातली आहे. त्यानुसार पुरुष तसेच महिलांच्या स्पर्धेत सर्वोत्तम 80 स्पर्धकच सहभागी होऊ शकतील. त्यातही पुरुषांसाठी 2 तास 11.30 मिनिटे आणि महिलांसाठी 2 तास 29.30 मिनिटे ही पात्रता वेळ आहे. भारतीयांसाठी ही पात्रता वेळ मुंबईत गाठणे अवघडच आहे, हे मार्गदर्शक मान्य करतात. 

Web Title Mumbai Marathon 2020 CM Uddhav Thackeray flags off Dream Run

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com